शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

प्रवाशांच्या मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 2:18 PM

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे.

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे. रेल्वे प्रशासनाने त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.रेल्वे स्थानकावरील नवीन फूट ओव्हर ब्रीजचे काम असल्याने येथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील शौचालय पाडण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मच्या पश्चिम दिशेत नवीन शौचालय बांधण्यात आले; मात्र त्यासंदर्भात सूचना नसल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील अकोला गणमान्य स्थानकापैकी एक आहे. त्यात अधिक प्रगती म्हणून येथे रेल्वे ओव्हर फुटब्रीजचे बांधकाम सुरू झाले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकपासून सुरू होणारा हा नवीन फु ट ओव्हर ब्रीज प्लॅटफॉर्म क्रमांक पाचपर्यंत विस्तारला जाणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी होत असलेल्या या ब्रीजच्या बांधकामामुळे मात्र पूर्वीचे शौचालय तोडण्यात आले आहे.

प्लॅटफॉर्म ४-५ वरील शौचालयास कुलूपदक्षिण-मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४-५ वरील पश्चिम दिशेत शौचालय तयार आहे; मात्र त्याला नेहमी कुलूप लागलेले असते. त्यामुळे प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नाही. प्रवाशांना सुविधा द्यायच्या नसतील तर त्याचे बांधकाम तरी कशासाठी केले, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर बदलली जातेय फरशीअकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-२ वरील फरशी बदलली जात आहे. त्यामुळे अकोला स्थानकावर येणाऱ्या मुंबईसह पुणे, अहमदाबाद, कोल्हापूर गाड्यांना काही अंतरावर थांबविले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणीही केली जात आहे. 

 

टॅग्स :Akola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकAkolaअकोला