विशेष पथकाची हॉटेलसह दोन ठिकाणी छापेमारी
By Admin | Updated: April 9, 2017 01:38 IST2017-04-09T01:38:19+5:302017-04-09T01:38:19+5:30
हॉटेलमधून अवैधरीत्या विक्री करण्यात येत असलेल्या देशी-विदेशी दारूसह २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
_ns.jpg)
विशेष पथकाची हॉटेलसह दोन ठिकाणी छापेमारी
अकोला : बाश्रीटाकळी रोडवरील खडकी परिसरात असलेल्या राधिका हॉटेलवर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी शनिवारी दुपारी छापा टाकला. या हॉटेलमधून अवैधरीत्या विक्री करण्यात येत असलेल्या देशी-विदेशी दारूसह २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर दुसरा छापा ख्रिश्चन कॉलनीतील वरली अड्डय़ावर टाकून दोन जणांना अटक करण्यात आली.
खडकीतील हॉटेल राधिकामधून देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करण्यात येत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह या हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलची झाडाझडती घेतल्यानंतर देशी आणि विदेशी दारूच्या साठय़ासह २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या ठिकाणावरून संदीप राजेश मेंदे, राजेश पंजाब चव्हाण आणि आनंद मधुकर ठेवानी या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर ख्रिश्चन कॉलनी येथील वरली अड्डय़ावर छापा टाकून दादाराव देवमन सोनोने, राम जयराम खंडारे या दोघांना अटक केली. या पाच जणांविरुद्ध खदान पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अळसपुरे यांनी त्यांच्या पथकासह केली.