मुर्तीजापुरात जुगारावर छापा; चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 18:35 IST2022-03-24T18:34:59+5:302022-03-24T18:35:09+5:30
Raids on gambling in Murtijapur; 4 accused arrested : त्यांच्याकडून ५ हजार ९७० रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला.

मुर्तीजापुरात जुगारावर छापा; चौघांना अटक
मूर्तिजापूर : येथील अहिल्याबाई होळकर कॉम्प्लेक्स मागील भागात चालणाऱ्या वरली जुगारावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने २४ मार्च रोजी छापा मारून चौघांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडून ५ हजार ९७० रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर येथील अहिल्याबाई होळकर कॉम्प्लेक्स भागात वरली जुगारावर छापा टाकला असता काही इसम वरली जुगारावर पैसे हारजीत खेळताना मिळून आले. पोलीसांनी आरोपी सय्यद नाजीम सय्यद ताज, गजानन बाबाराव शिरभाते, मनोहर सखाराम मुगल, रियाजखांन अताउल्ला खान सर्व रा मूर्तिजापुर यांना ताब्यात घेतले, यांच्याजवळून नगदी २ हजार ९७० रुपये ३ मोबाइल असा ५ हजार ९७० रूपयाचा मुद्देमाल जपत करून मूर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन येथे कलम १२ अ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांनी येथे केली.