दारू, वरली अड्डय़ांवर छापेमारी

By Admin | Updated: May 28, 2017 03:44 IST2017-05-28T03:44:07+5:302017-05-28T03:44:07+5:30

मोठय़ा प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला

Raid on liquor, worli stalls | दारू, वरली अड्डय़ांवर छापेमारी

दारू, वरली अड्डय़ांवर छापेमारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरासह जिल्हय़ात विविध ठिकाणच्या दारू अड्डय़ांसह वरली अड्डय़ांवर पोलिसांनी शनिवारी छापेमारी केली. यामध्ये मोठय़ा प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात हिरपूर फाटा येथे छापा टाकून ६ हजार ७२0 रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली तर एम एच ३८ क. २३३३ सह असा एकूण ५ लाख ६ हजार ७२0 रुपयांचा माल जप्त केला व आरोपी सिद्धार्थ कोकने वय २७ वर्ष रा. माना यास अटक करण्यात आली. यासोबतच सिटी कोतवाली पोलिसांनी लाल बंगला परिसरात छापा मारून लाल बंगला येथील अफजल खान फिरोज खान याला अटक केली. त्याच्याकडून २ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, कीर्ती नगर येथून देशी व विदेशी दारूची अवैध रित्या वाहतूक करणार्या आकाश वासुदेव जामोदे रा डाबकी रोड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी दारूच्या ४६ बाटल्या व मुद्देमाल जप्त केला आहे. सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार अन्वर शेख व कर्मचार्यांनी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणारा रवी किसनराव मामनकर रा. तेल्हारा याला अटक केली. त्याच्याकडून ४ हजार २00 रुपयांची दारू जप्त केली. सिटी कोतवाली पोलिसांनी आनिकट परिसरातील जुगार अड्डय़ावर छापा टाकून आकाश खंडारेला ताब्यात घेतले आहे व त्याच्याकडून १ हजार ९४0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Raid on liquor, worli stalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.