कुंभारी येथील मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:15 IST2021-04-03T04:15:22+5:302021-04-03T04:15:22+5:30
शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाची कारवाई अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी येथे जोरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ...

कुंभारी येथील मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड
शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाची कारवाई
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी येथे जोरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून नऊ जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कुंभारी येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांना मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने कुंभारी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून महादेव मारुती शिरसाट (वय ७५, रा. कुंभारी), शेख कलीम शेख मोहिनुद्दीन (वय ४०, रा. शिवनी), गजानन साहेबराव शिरकरे (वय २९,रा. कुंभारी), जयश्रीराम तुळशीराम गवई (वय ६४,रा कुंभारी), गजानन अंबादास भोवते (वय ४४,रा. शिवनी), प्रमोद शांताराम तायडे (वय ३२. रा. कुंभारी), राहुल माणिक खंडारे (वय ३६, रा. शिवनी), नितेश गणेश काशिदे (वय ३२, रा. नवीन भीमनगर), राजेश दादाराव डोके (वय ३२, रा. विशालनगर शिवनी) या जुगऱ्यांना अटक केली.
त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम- कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाचे महेंद्र बहादुरकर, जितेंद्र हरणे, राज चंदेल, विनय जाधव यांनी केली.