शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावर धाड; पोलिस उपनिरीक्षकासह चौघांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: May 15, 2014 20:56 IST

जुगार खेळत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक व्ही.पी. बुरुंगे आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हे दाखल.

मूर्तिजापूर : येथील नगर परिषदेच्या सार्वजनिक वाचनालयानजीकच्या एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर परीविक्षाधीन पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी धाड टाकून जुगार खेळत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक व्ही.पी. बुरुंगे आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यावेळी तिघांना अटक करण्यात आली; परंतु बुरुंग फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, १४ मे च्या रात्री आठ वाजताचे दरम्यान जुनी वस्ती कोकणवाडी मार्गावरील नगर परिषदेच्या सार्वजनिक वाचनालयानजीकच्या राजू देशमुख यांच्या घरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती परिविक्षाधीन पोलिस निरीक्षक प्रवीण मुंढे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह तेथे धाड टाकली. त्यावेळी तेथे मूर्तिजापूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक व्ही.पी. बुरुंगे व इतर तीन जण जुगार खेळत होते. धाड पडल्याचे समजताच बुरुंगे तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. इतर तीन जण मात्र पोलिसांच्या हाती पडले. पोलिसांनी बुरुंगे यांची मोटारसायकलसह आणखी एक मोटारसायकल व जुगाराच्या साहित्यासह ७५ हजार ४५ रुपयांचा ऐवज जप्त केला. राजू देशमुख (३१), वैभव इंगोले (२७) राजेंद्र कोठारी (२५) सर्व रा. मूर्तिजापूर व पीएसआय बुरुंगे यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायद्याच्या कलम ४/५ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. मूर्तिजापूरच्या इतिहासात प्रथमच कायद्याचे रक्षक पोलिसच जुगार खेळताना आढळून आल्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ माजली आहे.