रीगल सिनेमागृहानजीकच्या जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:17 IST2021-03-07T04:17:53+5:302021-03-07T04:17:53+5:30

अकोला : सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रीगल सिनेमागृहाच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपनिरीक्षक सचिन कदम ...

Raid on a gambling den near Regal Cinema | रीगल सिनेमागृहानजीकच्या जुगार अड्ड्यावर धाड

रीगल सिनेमागृहानजीकच्या जुगार अड्ड्यावर धाड

अकोला : सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रीगल सिनेमागृहाच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपनिरीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला. या ठिकाणवरून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

रिगल टॉकीजच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधिक्षक सचिन कदम यांना मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने छापा टाकून या जुगार अड्डावरून श्यामलाल अग्रवाल राहणार रिगल टॉकीज जवळ, अक्षय सोनी राहणार रिगल टॉकीज जवळ, मनोज गाडेकर राहणार हरिहर पेठ, शंकर मालटे राहणार डाबकी रोड, मयूर मेहाता राहणार खोलेश्वर, गोविंद शर्मा राहणार रिगल टॉकीज, वैभव कवडे राहणार जय हिंद चौक, भगवंत ढोरे राहणार रजपूत पुरा, मंगेश भारस्कार राहणार पिल कॉलनी या नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगारीविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली.

Web Title: Raid on a gambling den near Regal Cinema