कृषी नगर मोठी उमरी येथील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:17 IST2021-02-15T04:17:28+5:302021-02-15T04:17:28+5:30

अकोला : सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी नगर व मोठी उमरी येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार ...

Raid on gambling den at Krishi Nagar Moti Umri | कृषी नगर मोठी उमरी येथील जुगार अड्ड्यावर छापा

कृषी नगर मोठी उमरी येथील जुगार अड्ड्यावर छापा

अकोला : सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी नगर व मोठी उमरी येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविरोधी कक्षाने छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी नगर येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून रामू विजय सोनोने, रोहित शामराव जाधव, किरण रामा कनाडे व मालक-चालक सतीश रघुनाथ वानखेडे (सर्व रा. कृषी नगर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोठी उमरी येतील महाकालीनगरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ज्ञानेश्वर रामकृष्ण कुकडकर, रामदास आत्माराम टिकार, विशाल रमेश कपले (सर्व रा. उमरी) यांच्याविरुद्ध जुगारच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on gambling den at Krishi Nagar Moti Umri