कौलखेड येथील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST2021-04-29T04:14:32+5:302021-04-29T04:14:32+5:30

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने ...

Raid on gambling den at Kaulkhed | कौलखेड येथील जुगार अड्ड्यावर छापा

कौलखेड येथील जुगार अड्ड्यावर छापा

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने बुधवारी छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून तिघांना अटक करण्यात आली आहे.

कौलखेड परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकाला जुगार अड्ड्यावर छापा करण्याचे निर्देश दिले. पथकाने बुधवारी दुपारी या जुगार अड्ड्यावर छापा टाकून संदीप बुंदेले वय ३३ वर्षे रा. कौलखेड, शिवहरी भोगरे वय ४१ वर्षे रा. सुकळी, अजय ठाकूर वय ४० वर्षे रा. कौलखेड या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाने केली.

Web Title: Raid on gambling den at Kaulkhed