बाेकडांच्या झुंजीवर चालणाऱ्या जुगारावर धाड, आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 18:33 IST2021-02-07T18:33:09+5:302021-02-07T18:33:19+5:30

Akola News बाेकडांची झुंज लढवून त्यांच्या हार जीतवर पैसे लावून जुगार अड्डा चालवीत असल्याची माहीती विशेष पथकाचे प्रमूख विलास पाटील यांना मीळाली.

Raid on fight of Goats at Akola | बाेकडांच्या झुंजीवर चालणाऱ्या जुगारावर धाड, आठ जणांना अटक

बाेकडांच्या झुंजीवर चालणाऱ्या जुगारावर धाड, आठ जणांना अटक

अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दम्मानी नेत्र रुग्णालयाच्या पाठीमागे बाेकडांच्या झुंजीवर माेठया प्रमाणात जुगार अड्डा सुरु असतांना पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने रविवारी छापा टाकला. या ठिकाणावरून सहा बाेकूड जप्त करण्यात आले असून मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला आहे.

दम्मानी नेत्र रुग्णालयाच्या पाठीमागे मैदान असून या मैदानावर ८ ते १० जन त्यांच्या बाेकडांची झुंज लढवून त्यांच्या हार जीतवर पैसे लावून जुगार अड्डा चालवीत असल्याची माहीती विशेष पथकाचे प्रमूख विलास पाटील यांना मीळाली. या माहीतीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून बाेकडांची झुंज लावतांना कालू महेबूब गोरवे, मोहम्मद हारिस अब्दुल राशिद, मोहम्मद फिरोज हाजी शब्बीर, तीघेही रा. गवळीपुरा, जय कनोजिया, चंपालाल कनोजिया धीरज सुरेश कैथवास, राकेश मुन्ना बीचेले सर्व रा. बापू नगर व सलीम भिका गोरवे रा नायगांव या आठ जनांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून सहा बाेकूड, ९ हजार रुपये कीमतीचे ४ माेबाइल, २८ हजार रुपये कीमतीक्षच्या खुर्च्या टेबल मंडप तसेच १० हजार रुपये कीमतीचे इतर साहित्य एक लाख ५० हजार रुपये कीमतीचे सहा एडके असा एकून एक लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आराेपींविरुद्ध जुगार प्रतीबंधक अधीनीयमाच्या कलम 12(ब), भारतीय दंड विधानाच्या कलम 429, प्राण्यांची निर्दयतेने वाहतुक करून वागणुक देणे 1960 च्या कायद्यातील कलम 11 आ ड़ म न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाइ विशेष पथकाचे प्रमूख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on fight of Goats at Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.