बार्शिटाकळी येथील दाेन जुगार अड्ड्यांवर छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:25+5:302021-02-05T06:17:25+5:30
अकाेला : बार्शिटाकळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रात व एका मैदानावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविराेधी पथकाने शुक्रवारी छापेमारी केली. ...

बार्शिटाकळी येथील दाेन जुगार अड्ड्यांवर छापेमारी
अकाेला : बार्शिटाकळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रात व एका मैदानावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविराेधी पथकाने शुक्रवारी छापेमारी केली. या दाेन्ही ठिकाणांवरून १२ जुगारींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून राेख रकमेसह १५ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बार्शिटाकळी शहराजवळ असलेल्या नदीपात्रात आकाश भारत दाभाडे, किशोर रामकृष्ण नंदाने, राजेश प्रभाकर ताकवाले, देवा प्रल्हाद राठोड (सर्व रा. बार्शिटाकळी) या चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर बार्शिटाकळी शहरातील जुगार माफिया सद्दाम याच्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविरोधी पथकाने छापा टाकून आठ जुगारींना रंगेहाथ अटक केली. यामध्ये सय्यद साजिद सय्यद तैयब, फैजान खान अलियार खान, आबिद खान अलियार खान, शेख बिस्मिल्लाह शेख इस्माइल, रामराव विश्वनाथ मुंडे, अब्दुल हमीद अब्दुल खलील, नारायण सुखदेव जामनिक व दिनकर मारोती जामनिक (सर्व रा. बार्शिटाकळी) यांना अटक केली. त्यांच्याकडून राेख रकमेसह १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दाेन्ही कारवाईत १२ जुगारींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १५ हजार रुपये जप्त केले. या जुगारींविरुद्ध बार्शिटाकळी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.