बड्या जुगारावर छापा; लाखाचा मुद्देमाल जप्त; चार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 13:24 IST2019-01-25T13:24:01+5:302019-01-25T13:24:45+5:30

अकोला: खदान परिसरातील शासकीय गोदामामागे सुरू असलेल्या बड्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून चार मोठ्या जुगारींना अटक केली.

Rad on gambling; Millions of money seized; Four Arrested | बड्या जुगारावर छापा; लाखाचा मुद्देमाल जप्त; चार अटकेत

बड्या जुगारावर छापा; लाखाचा मुद्देमाल जप्त; चार अटकेत


अकोला: खदान परिसरातील शासकीय गोदामामागे सुरू असलेल्या बड्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून चार मोठ्या जुगारींना अटक केली. या जुगारींकडून एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई गुरुवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
शासकीय गोदामामागे गुरुनामसिंह मेहेरसिंह टाक याचा मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांना मिळाली. त्यांनी सदर घटनास्थळाची पंचासमक्ष पडताळणी केली असता या ठिकाणावर मोठा जुगार अड्डा सुरू असल्याचे दिसून येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या अड्ड्यावर छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून गुरुनामसिंह मेहेरसिंह टाक ४४ रा. खदान, कमलेश लक्ष्मणदास सचवानी ३५ रा. कच्ची खोली सिंधी कॅम्प, विजय सीताराम पवार ३९ रा. जेतवन नगर खदान, गजानन शारंगधर धानोकार ३४ रा. शांतता नगर बाळापूर रोड या चार जणांना अटक करण्यात आली. सदर अड्ड्यावर एक्का-बादशहा नावाचा मोठा जुगार अड्डा सुरू होता. या चार जुगारींकडून १५ हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य, दोन मोबाइल, दुचाकी असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, शंकर, शक्ती कांबळे, मनोज नागमते, मंगेश मदनकार, गोपाल, विजय व मेंढे यांनी केली.

 

Web Title: Rad on gambling; Millions of money seized; Four Arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.