शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

रेबीजने देशात होतोय दरवर्षी २० हजारांवर लोकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 15:28 IST

रेबीज (पिसाळणे) हा एक भयंकर रोग असून, पिसाळलेल्या कुत्र्यांपासून मानव व इतर पशूंना हा रोग होतो.

ठळक मुद्देदरवर्षी २० हजारांच्यावर लोकांचा मृत्यू होत असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. जागतिक रेबीज दिनानिमित्त शुक्रवार,२८ सप्टेंबर रोजी मोफत रेबीज रोगप्रतिबंधक लस दिली जाणार आहे.

अकोला : पाळीव कुत्र्यांची संख्या अलीकडे वाढली असून, पाळीव कुत्र्यांचे रेबीज या रोगापासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या पशू चिकित्सालयामध्ये जागतिक रेबीज दिनानिमित्त शुक्रवार,२८ सप्टेंबर रोजी मोफत रेबीज रोगप्रतिबंधक लस दिली जाणार आहे.रेबीज (पिसाळणे) हा एक भयंकर रोग असून, पिसाळलेल्या कुत्र्यांपासून मानव व इतर पशूंना हा रोग होतो. त्यामुळे जगात ५२ ते ५४ हजार लोक मृत्युमुखी पडतात. ५४ हजारांपैकी भारतात दरवर्षी २० हजारांच्यावर लोकांचा मृत्यू होत असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूचे हे प्रमाण ३६ टक्के आहे. या रोगाचा प्रसार होऊन नये म्हणून कुत्र्यांना रेबीज रोग प्रतिबंधक लस देणे अनिवार्य आहे.२८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन आहे. यानुषंगाने स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्यावतीने मोफत लसीकरण करू न दिले जाणार असून, कुत्र्यांची आरोग्य तपासणी, त्यांची निगा, होणारे विविध घातक रोग व त्याचा प्रतिबंध इत्यादीबाबत पशू चिकित्सालयाचे तज्ज्ञ डॉक्टर श्वान संगोपनावर अद्ययावत माहिती देणार आहेत. चिकित्सालय अधीक्षक डॉ. एस. पी. वाघमारे, डॉ.एम. जी. थोरात, डॉ. सी.एच. पावसे, डॉ. के.एस. पजई, डॉ. एम.एफ. सिद्दिकी, डॉ. एम.व्ही. इंगवले, डॉ. एस.जी. देशमुख, डॉ.एस.डी. चपटे, डॉ. फरहीन फानी, डॉ. एम. जी. पाटील या तज्ज्ञांनी यासाठीची जय्यत तयारी केली आहे.- रेबीज हा जीवघेणा रोग असून, कुत्र्यांपासून तो मानव व पशूंना होतो. जगाच्या तुलनेत भारतात या रोगाचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे श्वानप्रेमींनी कुत्र्यांची निगा राखावी व रेबीज लसीकरण करू न घ्यावे, हे लसीकरण मोफत आहे.डॉ. हेमंत बिराडे,अधिष्ठाता,स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था,अकोला . 

टॅग्स :Akolaअकोलाdogकुत्रा