शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
5
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
6
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
7
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
8
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
9
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
10
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
11
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
12
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
13
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
14
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
15
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
16
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
17
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
18
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
19
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांच्या मुक्कामातून निकाली निघावे प्रश्न

By admin | Updated: June 5, 2014 01:32 IST

अकोला‘लोकमत’च्यावतीने आयोजित परिचर्चेतील सूर

अकोला : राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे महिन्याच्या दुसर्‍या शुक्रवारी अधिकारी एखाद्या गावात मुक्कामी जाऊन, तेथील ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र अधिकार्‍यांच्या मुक्कामातून खेड्यातील प्रश्न निकाली निघावे, अडचणींवर उपाययोजना करून, खेड्यांचा विकास व्हावा, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चा कार्यक्रमात बुधवारी उमटला. लोकमतच्यावतीने आयोजित या परिचर्चेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसिलदार दिनेश गिते, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे, मलकापूरचे सरपंच राजीव वगारे व सांगवी मोहाडीचे उपसरपंच दिनकर वाघ यांनी सहभाग घेतला. राज्याचे मुख्य सचिव ज.स. सहारिया यांनी गत महिन्यात राज्या तील अधिकार्‍यांची ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सिंगह्ण घेऊन, जिल्हाधिकार्‍यांसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या शुक्रवारी एखाद्या गावात मुक्कामी जाऊन गावातील लोकांच्या अडचणी, समस्या व तक्रारी जाणून घ्याव्या, आणि त्यावर उ पाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने जिल्हाधिकार्‍यांसह एसडीओ, तहसीलदार तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या शुक्रवारी संबंधित गावात जाऊन, तेथील ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेण्याचा उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला. अधिकार्‍यांच्या मुक्कामात अडचणींवर केवळ चर्चा न होता, करावयाच्या उपाययोजनांसाठी सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्यासह ग्रामस्थांच्या सहभागाचीही आवश्यकता, त्यामधूनच हा उपक्रम यशस्वी होईल, अशी मते या परिचर्चेतून मांडण्यात आली. एकुणच शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सकारात्मक भूमिका वक्त्यांची दिसून आली.