तेल्हारा येथे पंजाबराव देशमुख जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST2020-12-29T04:18:26+5:302020-12-29T04:18:26+5:30

समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे आजीवन सभासद पुरुषोत्तम दहे, ...

Punjabrao Deshmukh Jayanti celebrations at Telhara | तेल्हारा येथे पंजाबराव देशमुख जयंती साजरी

तेल्हारा येथे पंजाबराव देशमुख जयंती साजरी

समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे आजीवन सभासद पुरुषोत्तम दहे, त्र्यंबकराव चोपडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी प्रा. डॉक्टर कृष्णा माहुरे यांनी केले. प्राध्यापक डॉ. धीरजकुमार नजान यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गोपाल ढोले यांनी अध्यक्षीय समारोपात विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. एम. के. नन्नावरे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील वरिष्ठ प्रा. आर. व्ही. लोणकर, प्रा. एम. पी. चोपडे, प्रा. एम. एम. कवरके, डॉ. जी. ओ. जोंधळेकर व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Punjabrao Deshmukh Jayanti celebrations at Telhara