पुंडलिकराव उमप यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:21 AM2021-03-01T04:21:51+5:302021-03-01T04:21:51+5:30

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो) -------------------------------- गजानन ...

Pundalikrao Ump passed away | पुंडलिकराव उमप यांचे निधन

पुंडलिकराव उमप यांचे निधन

Next

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

--------------------------------

गजानन ठाकरे

पिंजर: येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी उपसभापती गजानन महादेवराव ठाकरे (५५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा आप्त परिवार आहे. जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख राजेश ठाकरे यांचे ते बंधू होत. (फोटो)

--------------------------

शंकर गोमासे

खानापूर: येथील शंकर तुळशीराम गोमासे (४९) यांचे दीर्घ आजाराने दि. २८ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

----------------------------

शंकरराव राहाटे

हिवरखेड : स्थानिक शंकरराव पंढरी रहाटे (९६) यांचे २६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे, एक भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. ते सत्यव्रत रहाटे यांचे वडील तर वसंतराव राहाटे यांचे मोठे बंधू होत. (फोटो)

-------------------------------------

डोंगरगाव ग्रामपंचायत कार्यालयात संत रविदास महाराज जयंती साजरी

डोंगरगाव: येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रूपाली नागपुरे, उपसरपंच किशोर काकडे, सदस्य संदीप वैराळे, देवराव इंगळे, रुख्मिना भड, कोमल खडे, पद्मा नेवारे, सुनीता देशमुख, सचिव सी.यू. कुरेशी, पोलीस पाटील राजेश वाघाडे, कर्मचारी राजमल हिवराळे यांची उपस्थिती होती. (फोटो)

-------------------------------------

चोहोट्टा बाजार-पारळा रस्त्याची दुरवस्था!

चोहोट्टा बाजार: चोहोट्टा बाजार-पारळा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. परिसरातील नागरिकांना अकोला-तेल्हारा बस सुविधा चालू आहे; परंतु रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे बस वेळेवर पोहोचत नसल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी टाकळी खुर्दचे सरपंच मंगेश ताडे, विष्णुदास बुंदे, बाळकृष्ण वावरे, गजानन ताडे, योगेश इंगळे, शिवदास बुंदे, रवी मालटे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (फोटो)

Web Title: Pundalikrao Ump passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.