पुंडलिक बाबा यात्रा महोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST2021-04-16T04:18:06+5:302021-04-16T04:18:06+5:30

मूर्तिजापूर : दरवर्षीप्रमाणे होऊ घातलेला पुंडलिक बाबा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या शनिवारी, १७ ...

Pundalik Baba Yatra Festival canceled | पुंडलिक बाबा यात्रा महोत्सव रद्द

पुंडलिक बाबा यात्रा महोत्सव रद्द

मूर्तिजापूर : दरवर्षीप्रमाणे होऊ घातलेला पुंडलिक बाबा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या शनिवारी, १७ व १८ एप्रिल रोजी पुंडलिकनगर सिरसो येथे साजरा करण्यात येणारा श्री पुंडलिक बाबा जन्मोत्सव व दहीहंडी कार्यक्रम, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. जन्माेत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, उपरोक्त जयंती महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भाविकांचा मेळा येथे जमत असतो, यानिमित्ताने होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी जन्मोत्सवाला येऊ नये व जन्मोत्सव हा घरीच साजरा करावा, असे आवाहन श्री पुंडलिक महाराज संस्थानच्या वतीने विठ्ठलराव पातोंड व विवेक पातोंड यांनी केले आहे. तद्वतच पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे.

Web Title: Pundalik Baba Yatra Festival canceled