शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

'ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 15:48 IST

अकोला : राज्यातील इतर मागावसवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहीजे, अशी आमची असून, मराठा आरक्षणाचे राजकारण होऊ नये, असे मत भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देओबीसीमधील ३४८ जाती आणि विविध संघटनांसोबत संवाद साधून, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संवाद संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.ओबीसींमधील वंचीत, दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य शासनामार्फत करण्यात येत असल्याचेही विजय चौधरी यांनी स्पष्ट केले.

अकोला : राज्यातील इतर मागावसवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहीजे, अशी आमची असून, मराठा आरक्षणाचे राजकारण होऊ नये, असे मत भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना राज्यातील ‘ओबीसी’पर्यंत पोहोचविणे तसेच ‘ओबीसी’मधील भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने २२ जुलैपासून विदर्भात संवाद संपर्क अभियान सुरु करण्यात आले असून, ओबीसीमधील ३४८ जाती आणि विविध संघटनांसोबत संवाद साधून, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संवाद संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ‘ओबीसी’अंतर्गत विविध घटकांची माहिती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले. या अभियानानंतर भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने राज्यात ‘ओबीसी जोडो ’ अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगत, ओबीसींमधील वंचीत, दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य शासनामार्फत करण्यात येत असल्याचेही विजय चौधरी यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर पाटील, विभागीय अध्यक्ष सुभाष घाटे, अकोला शहर अध्यक्ष जयंत मसने, डॉ.विनोद बोर्डे उपस्थित होते.आघाडी सरकारने केवळ ठराव घेतला; फडणवीस सरकारने कायदा केला !यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षणासाठी विधानसभेत केवळ ठराव घेतला; मात्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कायदा केला. मराठा आरक्षणासाठी कायदा करणारे फडणवीस सरकार राज्यातील पहिले सरकार आहे, असा दावा करीत, मराठा आरक्षणासाठी यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाOBCअन्य मागासवर्गीय जातीreservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण