विद्युत खांब उभारणीसाठी तीन काेटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 10:55 IST2021-02-13T10:55:08+5:302021-02-13T10:55:15+5:30

Akola News चार प्रमुख रस्त्यांवर विद्युत खांब उभारण्यासाठी तीन काेटी ३८ लाख निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

Proposal of three crores for construction of electric poles in Akola City | विद्युत खांब उभारणीसाठी तीन काेटींचा प्रस्ताव

विद्युत खांब उभारणीसाठी तीन काेटींचा प्रस्ताव

अकाेला : शहरातील प्रमुख चार मार्गांवर मागील दाेन वर्षांपासून अंधाराची समस्या कायम आहे. मनपाकडे निधी नसल्यामुळे नेकलेस राेड, टिळक राेड, खाेलेश्वर मार्ग व मलकापूर मार्गावर एलइडी पथदिवे उभारले नाहीत. याव्यतिरिक्त गाेरक्षण राेडवरील भाेले किराणा ते क्रांती चाैकपर्यंतही अंधार आहे. नागरिकांमध्येे राेष निर्माण झाल्याचे पाहून मनपाने सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेतून चार प्रमुख रस्त्यांवर विद्युत खांब उभारण्यासाठी तीन काेटी ३८ लाख निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडे निधीची चणचण असल्याची माहिती समाेर आली आहे.

तत्कालीन भाजप - शिवसेना युतीच्या कालावधीत एलइडी पथदिव्यांसाठी राज्य शासनाने दहा काेटींचा निधी मंजूर केला हाेता. यामध्ये महापालिकेच्या चाैदाव्या वित्त आयाेगातून दहा काेटींचा निधी जमा करण्यात आला. एकूण २० काेटी रुपयांतून पाेल उभारणे व त्यावर एलइडी पथदिवे लावण्यासाठी पुणे येथील मे.राॅयल इलेक्ट्रिकल कंपनीची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान, केंद्र शासन प्रमाणित इइएसएल कंपनीला संपूर्ण शहरातील महापालिकेच्या खांबांवर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नियुक्त करण्यात आले. इइएसएलमार्फत सुमारे २८ काेटी रुपयांतून पथदिवे लावण्याचे काम प्रगतिपथावर आहे. असे असले तरी चार ते पाच प्रमुख रस्त्यांवर पथदिवे उभारणीसाठी विद्युत खांब नसल्यामुळे एलइडी दिवे लावण्यात आले नसल्याचे चित्र आहे. विद्युत खांब उभारणीसाठी मनपाने सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेतून तीन काेटी ३८ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला.

 

या रस्त्यांसाठी विद्युत पाेलचा प्रस्ताव

शहरातील नेकलेस राेड, निमवाडी लक्झरी बस स्टॅंड ते सिटी काेतवाली, सिटी काेतवाली ते थेट छत्रपती शिवाजी महाराज पार्क, गाेरक्षण राेडवरील भाेले किराणा ते क्रांती चाैक या प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये विद्युत पाेलची उभारणी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

 

असा आहे प्रस्ताव

मुख्य चार रस्त्यावरील दुभाजकामध्ये पथदिव्यांचे खांब उभारणे- १ काेटी १३ लाख रुपये

 

महावितरणच्या दाेन विद्युत खांबात जास्त अंतर असल्याने अशा ठिकाणी नवीन खांब उभारणे- १ काेटी ६८ लाख ५० हजार

 

मुख्य रस्त्यावर पथदिव्यांचे खांब उभारणे- ५७ लाख ३२ हजार रुपये

Web Title: Proposal of three crores for construction of electric poles in Akola City