पोलीस दलातील चाळीस पोलीस नाईकांना पदोन्नती

By Admin | Updated: September 4, 2015 01:08 IST2015-09-04T01:08:36+5:302015-09-04T01:08:36+5:30

जवळपास पोलीस नाईकांची पोलीस हेड कॉन्स्टेबलपदी बढती.

Promoting forty police constables of police force | पोलीस दलातील चाळीस पोलीस नाईकांना पदोन्नती

पोलीस दलातील चाळीस पोलीस नाईकांना पदोन्नती

अकोला: जिल्हय़ातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असणार्‍या ४0 च्या जवळपास पोलीस नाईकांची पोलीस हेड कॉन्स्टेबलपदी बढती करण्यात आली असून, त्यासंबंधीचे आदेश पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी गुरुवारी सायंकाळी दिले. जिल्हय़ातील १९ पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस नाईक म्हणून कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना हेड कॉन्स्टेबलपदी पदोन्नती दिल्याबाबतची यादी गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाने जाहीर केली. यादीमध्ये खदान पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रवींद्र अहेरकर, मनोज कोल्हटकर, रामेश्‍वर वाकोडे, मोहम्मद रफिक, दिलीप उमाळे, संजय महल्ले यांच्यासह ४0 पोलीस नाईकांचा समावेश आहे.

Web Title: Promoting forty police constables of police force