महावितरण अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 16:37 IST2019-06-25T16:37:22+5:302019-06-25T16:37:36+5:30
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची नाशिक परिमंडळात प्रशासकीय बदली झाली आहे

महावितरण अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची बदली
अकोला : महावितरणच्याअकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची नाशिक परिमंडळात प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी अजित इगतपुरीकर हे नवे जनसंपर्क अधिकारी म्हणून लवकरच रुजू होणार आहेत.
विकास आढे यांनी नोव्हेंबर २०१३ ते जून २०१९ पर्यंतच्या साडेसहा वर्षाच्या सेवाकाळात महावितरणची प्रतिमा जनसामान्यांमध्ये, वीज ग्राहकांमध्ये उंचाविण्याचे काम केले आहे. अकोला येथे येण्यापूर्वी ते महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळात कार्यरत होते. अकोला परिमंडळातील सर्वच मंडळामध्ये व तत्कालीन अमरावती परिमंडळामध्ये या कार्यकाळात त्यांनी ग्राहकांसाठी असलेल्या विविध सेवा,योजना,सकारात्मक कार्ये, यांची माहिती ग्राहकापर्यंत विविध माध्यमाद्वारे सातत्याने दिली. महावितरणच्या सेवेत येण्यापूर्वी त्यांनी पत्रकारीतेमध्ये कार्य केले असून, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय अंतर्गत असलेल्या जलस्वराज्य प्रकल्प जिल्हा परिषद गोंदिया येथे तर जिल्हा परिषद अकोला येथे संपूर्ण स्वच्छता अभियानात माहिती शिक्षण व संवाद तज्ञपदी तसेच जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारीपदी सेवा बजावलेली आहे.