शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सात जुगाऱ्यांना कारावासाची शिक्षा

By admin | Updated: June 14, 2017 02:15 IST

पोलिसांनी पकडलेल्या एका जुगारावरील सात जुगाऱ्यांना प्रथमश्रेणी न्यायालयाने मंगळवारी १० दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुगाऱ्यांचा डाव रंगतो, पोलीस कारवाई करतात आणि त्यानंतर पोलीस ठाण्यातून या जुगाऱ्यांना सोडून देण्यात येते. या प्रकारचे अनेक जुगार अड्डे आणि जुगारी आहेत; मात्र पोलिसांनी पकडलेल्या एका जुगारावरील सात जुगाऱ्यांना प्रथमश्रेणी न्यायालयाने मंगळवारी १० दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच प्रत्येकी ३०० रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील यशवंत नगर, वाशिम बायपासजवळ जुगार अड्डा सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरून सहायक पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे यांनी ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी छापा टाकला होता. पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून भारत सहदेव गोपनारायण, यशवंत भीमराव कांबळे, सुमित सुखदेव कांबळे, गौतम सहदेव कांबळे, समाधान गोमाजी सिरसाट, सुभाष नारायण पळसपगार सर्व राहणार यशवंत नगर, अब्दुल सलीम अब्दुल शमीम (रा. इराणी झोपडपट्टी) यांना अटक केली होती. त्यांच्याजवळून ५२ ताशपत्ते, १३ हजार ८५० रुपये रोख आणि चार मोबाइल असा ऐवज जप्त केला होता. सदर सात जणांविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई करून प्रकरण प्रथमश्रेणी न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सहावे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी श्वेता चांडक यांच्या न्यायालयाने सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासले, त्यानंतर समोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे सातही जुगाऱ्यांना दोषी ठरवत त्यांना प्रत्येकी दहा दिवसांची शिक्षा सुनावली, तसेच ३०० रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांच्या साध्या कैदेचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. जी.एल. इंगोले यांनी काम पाहिले.