फार्म हाऊसवरील जुगारावर छापा

By Admin | Updated: March 26, 2016 02:27 IST2016-03-26T02:27:53+5:302016-03-26T02:27:53+5:30

चेहरे रंगवून पोलिसांनी केली कारवाई; ३ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज जप्त.

Print on gambling farmhouse | फार्म हाऊसवरील जुगारावर छापा

फार्म हाऊसवरील जुगारावर छापा

अकोला: धुळवडीच्या दिवशी चेहरे रंगवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गायगाव रोडवरील एका फार्म हाऊसवर रंगलेल्या जुगारावर छापा घालून दहा आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून ५२ तास पत्ते, रोख ७४ हजार रुपये, सहा मोटारसायकली, सहा मोबाइल असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना गायगाव येथील फार्म हाऊसवर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चेहर्‍याला रंग फासून, गायगाव रोडवरील फार्म हाऊसवर छापा घातला.
यावेळी ५२ तास पत्त्यांचा जुगार खेळताना, अन्वर खान अय्यान खान (रा. नवाबपुरा), लाल खान हुसैन खान (रा. सोनटक्के प्लॉट), मिया खान (नवाबपुरा), नदी खान रहिम खान (नवाबपुरा), कल्लू खान बिस्मिल्ला खान (रा. सोनटक्के प्लॉट), फैजल खान लियाकत खान (रा. नवाबपुरा), युसूफ खान युनूस खान, गुलाम राज्जी गुलाम मुक्तार, शेख युसूफ शेख अनिफ, नासिर खान (सर्व रा. नवाबपुरा) यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून ३ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Web Title: Print on gambling farmhouse