प्राचार्यांची प्राध्यापकाच्या पत्नीला मारहाण

By Admin | Updated: August 31, 2016 01:23 IST2016-08-31T01:23:28+5:302016-08-31T01:23:28+5:30

लोणार येथील घटना; महाविद्यालयाच्या आवारातील घटना.

Principal beaten his teacher's wife | प्राचार्यांची प्राध्यापकाच्या पत्नीला मारहाण

प्राचार्यांची प्राध्यापकाच्या पत्नीला मारहाण

लोणार(जि. बुलडाणा), दि. ३0: येथील दुर्गा बनमेरू महाविद्यालयात महाविद्यालयात प्राचार्याने प्राध्यापकाच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना ३0 ऑगस्ट रोजी घडली.
महाविद्यालयातील कुलभूषण बावुस्कर यांची पत्नी मीना बकाले या प्राचार्य प्रकाश बनमेरू यांना पतीला देत असलेल्या नाहक त्रासाबद्दल विचारणा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी विचारणा केल्यामुळे प्रकाश बनमेरू, रमेश बनमेरू, लखन बनमेरू यांनी मीना बकाले यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
सायंकाळी उशिरापर्यंंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलिसांनी महिलेची तक्रार सकाळी १२ वाजतापासून तर सायंकाळी ८ वाजेपर्यंंत घे तली नाही. प्राचार्य बनमेरू महाविद्यालयात गोंधळ घातल्याप्रकरणी तक्रार देणार आहेत; मात्र सायंकाळपर्यंंत त्यांनी तक्रार दिली नाही. यापूर्वीही नोकरीवर लावून घेण्याकरिता पैशाच्या वादावरून या महाविद्यालयात मारहाणीचे प्रकार घडले आहेत.

Web Title: Principal beaten his teacher's wife