भाजापाल्याचे भाव घसरले; सुकामेव्याच्या भावात वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:16 IST2021-01-04T04:16:15+5:302021-01-04T04:16:15+5:30

बाजारात भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला असून, गत सप्ताहाप्रमाणेच पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. कांदा, बटाट्याच्या दरही आता कमी झाले ...

Prices of vegetables fell; Prices of dried fruits rise! | भाजापाल्याचे भाव घसरले; सुकामेव्याच्या भावात वाढ!

भाजापाल्याचे भाव घसरले; सुकामेव्याच्या भावात वाढ!

बाजारात भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला असून, गत सप्ताहाप्रमाणेच पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. कांदा, बटाट्याच्या दरही आता कमी झाले आहेत. आता बहुतांश भाज्यांचे दर कमी झालेले आहेत. फळबाजारात जवळपास पपई वगळता इतर फळांचे दर चढेच आहेत. पपई २० ते २५ रुपये किलोने विक्री करावी लागत आहे. सफरचंदही १०० रुपये किलोने विक्री होत असल्याचे चित्र आहे. सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाल्याने खारीक, खोबऱ्याच्या भावात वाढ झाली आहे. खारीक जवळपास २१० ते २८० रुपये प्रति किलो विक्री होत आहे.

--------------------------

भाजीपाल्याचे भाव

कांदे ४० ते ४५ रुपये, लसूण १०० ते १२० रुपये, फुलकोबी २० रुपये प्रति किलो, वांगी १० ते २० रुपये, मेथी १० ते २० रुपये, पालक २० ते ३० रुपये, दाेडके २० ते ३० रुपये, कोथिंबीर २० रुपये, हिरवी मिरची ३० ते ४० रुपये, कारली ४० ते ५० रुपये, बटाटे २० ते ३० रुपये प्रति किलोदराने मिळत आहे.

Web Title: Prices of vegetables fell; Prices of dried fruits rise!