गणेश मूर्तींवर महागाईचे सावट

By Admin | Updated: August 29, 2014 01:43 IST2014-08-29T01:37:45+5:302014-08-29T01:43:49+5:30

अकोला येथे मूर्तीचे दरात २५ ते ३0 टक्के वाढ.

The prices of Ganesha idols | गणेश मूर्तींवर महागाईचे सावट

गणेश मूर्तींवर महागाईचे सावट

अकोला : सुखकर्ता दु:खहर्ता गणरायाचे आगमन केवळ एका दिवसावर येऊन ठेपले असून, गणेश मूर्त्यांंनी बाजारपेठ सजली आहे. यावर्षीपासून शहरात अकोला क्रिकेट क्लब व भारत विद्यालय प्रांगणातच गणेश मूर्तींंची विक्री करण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीची दुकाने सजली आहेत.
लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंंत सर्वच जण गणेश उत्सवात सहभागी होत असतात. यावर्षी गणेश मूर्तींंवर महागाईचे सावट असले तरी गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. विविध गणेशोत्सव मंडळ व नागरिक गणेशाच्या तयारीत मग्न आहेत. अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर मनमोहक व आकर्षक विविध मुद्रांमध्ये असलेल्या गणेशाच्या मूर्तींं विक्रीसाठी आल्या आहेत. याबाबत माहिती देताना मूर्तिकार अप्पू पराग यांनी सांगितले की, मूर्तींंच्या भावात जवळपास २५ ते ३0 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशोक वाटिका परिसरातील दुकानांपेक्षा या ठिकाणी दुकान लावण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागत असल्यामुळेही मुर्तींंच्या भावात वाढ झाली आहे. पूर्वी गणेश उत्सवाच्या चार-पाच दिवसांपूर्वीच मूर्तींंची नोंदणी किंवा खरेदी केली जात होती. यावर्षी मात्र एक दिवसांवर उत्सव आला असला तरी मूर्तींंची खरेदी होत नाही आहे.

Web Title: The prices of Ganesha idols