संसारात पूर्व पतीची एन्ट्री, वाद विकोपाला, पतीने घेतला पत्नीला चावा!

By नितिन गव्हाळे | Updated: November 28, 2023 19:16 IST2023-11-28T19:15:58+5:302023-11-28T19:16:19+5:30

पती-पत्नीच्या संसारात कोणी परपुरूष आला तर संसाराचा विस्कोट होतो.

Previous husband's entry in the world, the dispute is over, the husband took the bite of the wife! | संसारात पूर्व पतीची एन्ट्री, वाद विकोपाला, पतीने घेतला पत्नीला चावा!

संसारात पूर्व पतीची एन्ट्री, वाद विकोपाला, पतीने घेतला पत्नीला चावा!

अकोला : पती-पत्नीच्या संसारात कोणी परपुरूष आला तर संसाराचा विस्कोट होतो. हे अनेक घटनांवरून समोर आले आहे. अकोला शहरातील मलकापूर भागातसुद्धा पती-पत्नीच्या संसारात पूर्व पतीची एन्ट्री झाल्याने, त्यांच्यात वाद विकोपाला गेले. त्यामुळे पतीने पत्नीच्या बोटाचा चावा घेत, तिला मारहाण केली. त्यानंतर पत्नीनेही पूर्व पतीच्या मदतीने पतीचे डोके फोडले. खदान पोलिसांनी या प्रकरणांत परस्परांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

मलकापूर भागात राहणाऱ्या ४२ वर्षीय पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे एका व्यक्तीसोबत २०१९ मध्ये लग्न झाले. परंतु काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार केल्याने, संतप्त झालेल्या पतीने २४ नोव्हेंबर रोजी सकाळी वाद घालून शिवीगाळ केली व उजव्या हाताच्या बोटाला चावा घेऊन जखमी केल्याची खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पतीनेही पत्नी व तिच्या पूर्व पतीविरूद्ध तक्रार दिली असून, त्यात पत्नीशी त्याचे अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. २४ नोव्हेंबर रोजी पत्नीने जुन्या कारणावरून वाद घातला. यावेळी तिचा पूर्व पतीसुद्धा हजर होता. दोघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि डोके फोडल्याचे म्हटले आहे. पतीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पत्नी व तिच्या पूर्व पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Previous husband's entry in the world, the dispute is over, the husband took the bite of the wife!