शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून वीटभट्टीसाठी परवानगी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:20 IST

बाळापूर तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी मनोज बनचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी केली आहे.

अकोला : बाळापूरात १५० पेक्षाही अधिक विटभट्ट्या अवैध असताना त्याचवेळी कुंभार समाजाच्या व्यक्तीला वीट पजावा सुरू करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून परवानगी दिली जात नसल्याचा प्रकार तहसीलमध्ये घडत आहे. याप्रकरणी चौकशी करून बाळापूर तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी मनोज बनचरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी केली आहे.मातीपासून विटा तयार करणे, हा कुंभार समाजाचा पिढीजात व्यवसाय आहे. सुशिक्षित बेरोजगार असल्याने पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून ९.५ टक्के व्याजदराने ४ लाख २५ हजार कर्ज घेतले. त्यातून विटभट्टी लावण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला. त्यामध्ये बाळापूर जवळच्या बाभूळखेड येथील जागेचा नकाशा दिला. माती उत्खननासाठी हाता येथील शेतकºयाचे संमतीपत्र दिले. तसेच व्यवसाय कर भरण्यासह इतरही दाखले अर्जासोबत दिले. ४ जानेवारी २०१९ रोजी केलेल्या अर्जानुसार अद्यापही वीटभट्टीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचवेळी बाळापूर शहरालगत १५० पेक्षाही अधिक वीटभट्ट्या अवैधपणे सुरू आहेत. विशेष म्हणजे, कुंभार समाजाला मातीची स्वामित्वधन रक्कम भरण्यापासून सुट देण्यात आली आहे. ती सवलत देण्यातही टाळाटाळ केली जात आहे. स्वामित्त्वधनातून सुट असलेली माती उत्खननाची परवानगी मिळत नसल्याने माती विकत घ्यावी लागते. सोबतच फ्लाय अ‍ॅश विकत घ्यावी लागते. त्याचा प्रचंड खर्च आहे. त्यामुळे बेरोजगार व्यक्तीचे नुकसान होत आहे. याप्रकरणी चौकशी करून तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बनचरे यांनी निवेदनात केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूर