शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य चिमुकल्या भावंडांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा; प्रेस क्लबने घेतली शिक्षणाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:19 IST

शिक्षणापासून वंचित असलेल्या या चिमुकल्या भावंडांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना सोमवारी जिल्हा परिषद शाळेत दाखल करून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला.

ठळक मुद्देदोन चिमुकली मुले हिना आणि धनराज यांच्यासोबत नंदकिशोर टाखेर हे सोनवाडी येथील माजी सरपंच बाळूभाऊ खिरोडकर यांच्या शेतात आले आहेत. या शाळाबाह्य बालकांवर तेल्हारा तालुका बालरक्षक तुलसीदास खिरोडकार यांची नजर गेली. त्यांनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगत मतपरिवर्तन केले आणि दोघाही भावंडांना हिवरखेड येथील जि.प.कन्या व मुलांच्या शाळेत दाखल केले.

- राजेश अस्वार

हिवरखेड (अकोला): आई-वडिलांना बाराखडीही माहिती नाही. केवळ पोटासाठी दुसऱ्याच्या शेतात राबणं, एवढंच त्यांना माहीत. दोन वेळच्या भ्रांतापायी त्यांची दोन चिमुकले मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत, याचेही त्यांना भान नाही. अशा परिस्थितीत तालुका बालरक्षक तुलसीदास खिरोडकर यांनी या आई-वडिलांना शिक्षणाचे महत्त्व सांगत, त्यांचे मतपरिवर्तन केले. एवढेच नाही तर शिक्षणापासून वंचित असलेल्या या चिमुकल्या भावंडांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना सोमवारी जिल्हा परिषद शाळेत दाखल करून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला.मध्यप्रदेशातून रोजगारासाठी पती, दोन चिमुकली मुले हिना आणि धनराज यांच्यासोबत नंदकिशोर टाखेर हे सोनवाडी येथील माजी सरपंच बाळूभाऊ खिरोडकर यांच्या शेतात आले आहेत. दोन वेळच्या जेवणाची सोय करताना, त्यांना चिमुकली दोन मुले शिक्षणापासून वंचित आहेत, याचे भानही नव्हते. शेतात राबणाºया आई-वडिलांसोबत चिमुकल्या हिना व धनराजचा दिवस जायचा. खायलाच पैसा नाही तर शिक्षणासाठी कुठून आणायचा, अशा परिस्थितीत शेतात जीवन व्यतीत करणाºया हिना व धनराज या शाळाबाह्य बालकांवर तेल्हारा तालुका बालरक्षक तुलसीदास खिरोडकार यांची नजर गेली. त्यांनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगत मतपरिवर्तन केले आणि दोघाही भावंडांना हिवरखेड येथील जि.प.कन्या व मुलांच्या शाळेत दाखल केले. आता त्यांच्या आयुष्यातील बाराखडीची अक्षरे गिरविण्याचा श्रीगणेशा झाला. ग्रामीण भागात हिना व धनराजसारखी अनेक शाळाबाह्य मुले भटकताना दिसून येतात. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यास, खºया अर्थाने ज्ञानगंगेच्या प्रवाहाला आणखीन गती येईल...हिवरखेड प्रेस क्लबने स्वीकारले पालकत्वया दोन्ही बालकांचे पालकत्व हिवरखेड प्रेस क्लबने स्वीकारून त्यांना स्कूलबॅग, वॉटरबॅग टिफिनबॉक्स व शालेय साहित्य शाळा प्रवेश प्रसंगी भेट दिल्या, तसेच या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी प्रेस क्लबने स्वीकारली. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मनीष भुडके, पत्रकार किरण सेदानी केंद्रप्रमुख प्रकाश राऊत, मुख्याध्यापक श्यामराव इंगळे, प्रकाश ढोकणे, साधना भोपळे, सुनंदा भुडके, नीलेश खिरोडकर, हर्षल खिरोडकर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षण