अकोला जिल्ह्यात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:45 AM2020-06-12T10:45:38+5:302020-06-12T10:45:57+5:30

या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे

Presence of rains in Akola district | अकोला जिल्ह्यात पावसाची हजेरी

अकोला जिल्ह्यात पावसाची हजेरी

Next

अकोला : शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. तसेच काही भागात चांगला पाऊस झाल्याने पेरणीस सुरुवात होणार आहे. कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. आलेगाव, वाडेगाव, मळसूर, डोंगरगाव मासासह अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला.
शिर्ला : शिर्लासह पातूर तालुक्यातील अनेक गावात विजेच्या गडगडाटांसह मान्सूनने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी दुपारी ४ वाजतापासून शिर्लासह पातूर शहर तथा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. तीन तास संततधार पाऊस सुरू होता.
पातूर तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. या दमदार पावसानंतर पेरणीस सुरुवात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अद्याप ६२ टक्के शेतकऱ्यांना बँक कर्जाची प्रतीक्षा आहे. सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर गुरुवारी कापूस मोजणी झालीच नाही. अद्यापही १ हजाराहून अधिक शेतकºयांना कापूस मोजणीची प्रतीक्षा आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जोरदार पाऊस येणार असल्याने आणखी काही दिवस खरेदी बंद राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे साई जिनिंगमधील जिनिंगचे काम कापसात आर्द्रता वाढल्यामुळे बंद राहण्याची शक्यता आहे. एकेक दिवस लांबत असल्यामुळे कापसाची मोजणी रखडली.
बँकांची कर्ज देण्याचे गती मंदावली. त्यामुळे शेतकºयांसमोर बी-बियाणे, खते कशाच्या भरवशावर खरेदी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Web Title: Presence of rains in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.