पीआरसीने दिले बाळापूर बीडीओ, ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश!

By Admin | Updated: June 3, 2017 02:04 IST2017-06-03T02:04:14+5:302017-06-03T02:04:14+5:30

बाळापूर: पंचायत राज समितीच्या पथकाने बाळापूर पंचायत समिती सभागृहात आल्यावर बराच वेळपर्यंत गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे हे आले नाही.

PRC gave Balapur BDO, Gramsevak orders to be suspended! | पीआरसीने दिले बाळापूर बीडीओ, ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश!

पीआरसीने दिले बाळापूर बीडीओ, ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश!

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर: पंचायत राज समितीच्या पथकाने बाळापूर पंचायत समिती सभागृहात आल्यावर बराच वेळपर्यंत गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे हे आले नाही. त्यामुळे शिंदे यांना निलंबित करण्याचे आदेश समितीचे अध्यक्ष आ. प्रकाश भारसाकळे यांनी समिती सचिव विलास आठवले यांना दिल्याची चर्चा यावेळी होती. कान्हेरी गवळीचे ग्रामसेवक जी.के. धाडसे वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांनाही निलबंनाचे आदेश दिल्याची माहिती आहे.
पंचायत समितीत अधिकारी हजर नसल्याने समितीने सभागृहातून बहिर्गमन केले. त्यानंतर पथकाने कान्हेरी (गवळी) येथील सिमेंट रस्त्याची पाहणी केली. या सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यांना घरकुल देण्याची शिफारस समितीने केली व तेथील नागरिकांच्या घरात जाऊन कामाची व घरकुल शासकीय योजनेबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहिरीचे देयक थकीत आहे. प्रत्येक ठिकाणी पैसे दिल्याशिवाय विहीर, घरकुलाचे देयक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मंजूर होत नसल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले.
शेळद येथील भिकुंड नदीमधील कोल्हापुरी बंधारा २००६-०७ मध्ये मंजूर झाला आहे. त्यासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. तो तक्रार नसतानाही बंद पडला. निकृष्ट दर्जाच्या या बंधाऱ्याबाबत समितीने नाराजी व्यक्त केली. याच बंधाऱ्याच्या दुरुस्ती बांधकामासाठी जि. प. ने ५८ लाख रुपये मंजू केले. एकूण ७८ लाख हे पाण्यात गेले असून, अल्पकाळातच हा बंधारा निकृष्ट दर्जाने नामशेष होईल. शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करण्यात आला. याबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येईल, असे समितीने स्पष्ट केले. रिधोरा येथील ग्रामपंचायतीची उत्कृष्ट इमारत, वैद्यकीय उपकेंद्र व जि. प. शाळेबाबत समाधान व्यक्त केले.पथकामध्ये समिती अध्यक्ष आ. प्रकाश भारसाकळे, आ. अमित झनक, राहुलदादा मोटे, आ. बुंदेले, समिती सचिव विलास आठवले, गटविकास अधिकारी वाय. डी. श्ािंदे, जि. प. बांधकाम विभागाचे अभियंता वामनराव राठोड, विस्तार अधिकारी पी. व्ही. दुधे आदी जि. प. व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रा. पं. ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. नगारिकांच्या आलेल्या तक्रारींना पाठपुरावा न करता आल्याने ग्रामविकास अधिकारी जी. के. धाडसे यांना सायंकाळपर्यंत निलंबित करण्याचे आदेश समितीने जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सुभाष पवार यांना दिले. दरम्यान या आदेशासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.

शाळेत आढळले मुदतबाह्य मिरची पावडर
शाळेतील भोजनालयात मिरची पावडर मुदतबाह्य आढळून आल्याने समिती सदस्य आ. अमित झनक यांनी मिरची पावडरबाबत कारवाई करण्यासाठी जबाबदारी ठरविण्याचे आदेश दिले. तसेच तांदळाच्या प्रत्येक कट्ट्यात कमी तांदूळ आढळून आले. तांदूळ मोजण्यासाठी काट्याचा वापर नसल्याने समितीने नाराजी व्यक्त केली तर याच जि. प. शाळेला दुरुस्ती बांधकामासाठी ७ लाख जि. प. ला निधी देण्याचा आदेश समितीने जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सुभाष पवार यांना दिले.

Web Title: PRC gave Balapur BDO, Gramsevak orders to be suspended!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.