प्रकाश रेड्डी अकोल्यातून फरार; युवतीवरील बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:27 IST2018-02-25T01:27:07+5:302018-02-25T01:27:07+5:30

अकोला : खडकी परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवतीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करणार्‍या भाजपच्या महिला जिल्हा परिषद सदस्याच्या पतीविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करताच प्रकाश रेड्डी हा आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Prakash Reddy escapes from Akola; A case has been registered against rape of a girl | प्रकाश रेड्डी अकोल्यातून फरार; युवतीवरील बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल 

प्रकाश रेड्डी अकोल्यातून फरार; युवतीवरील बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खडकी परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवतीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करणार्‍या भाजपच्या महिला जिल्हा परिषद सदस्याच्या पतीविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करताच प्रकाश रेड्डी हा आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
शहरातील खडकी परिसरातील रहिवासी ३१ वर्षीय युवती एका जीममध्ये जायची. याठिकाणी न्यू तापडिया नगरात राहणारा तथा जिल्हा परिषद सदस्याचा पती असलेला प्रकाश रुद्रस्वामी रेड्डी (४0) याच्याशी तिची ओळख झाली. विक्षिप्त मानसिकतेमध्ये असलेल्या प्रकाश रेड्डी याने तिच्यासोबत थेट शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली; परंतु युवतीने नकार दिला आणि लग्न करण्यास म्हटले. युवतीच्या वडिलांसोबतही त्याने ओळख निर्माण करून तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखविली. वडिलांनी त्यास सहमती दर्शविली. त्यानंतर नोव्हेंबर २0१६ मध्ये प्रकाश रेड्डी हा रात्री युवतीच्या घरी गेला. त्याने युवतीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रकाश रेड्डी हा विवाहित असल्याने, युवतीने त्याच्याशी संबंध तोडले. त्यानंतरही तो तिला त्रास देत होता. २२ फेब्रुवारी रोजी युवती घरी असताना, प्रकाश रेड्डी तिच्या घरी बळजबरीने घुसला आणि युवतीला मारहाण, शिवीगाळ करून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्यानंतर त्याचा शोध सुरू करताच आरोपी फरार झाला असून, ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Prakash Reddy escapes from Akola; A case has been registered against rape of a girl