शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By मोरेश्वर येरम | Updated: November 20, 2020 18:33 IST

वीज वापरली असेल तर त्याचं बिल भरावच लागेल, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या विधानानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देवीज कापल्यास वीज जोडणीची जबाबदारी घेणार वंचितवीज बिल माफीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवल्याचा आरोपराज्याचा कारभार मुख्यमंत्री चालवतायत की मंत्री? आंबेडकरांचा सवाल

अकोलाराज्यात ५० टक्के वीज बिल माफ होऊ शकते असा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला होता, पण हा प्रस्ताव राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवला, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

वीज बिल माफीच्या मुद्यावरुन राज्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. वीज वापरली असेल तर त्याचं बिल भरावच लागेल, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या विधानानंतर सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी याआधी नांदेड येथील पत्रकार परिषेदत उपस्थित केला होता. यासोबतच राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. 

अकोला येथे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. राज्याचा कारभार मुख्यमंत्री चालवत आहेत की  एखादा मंत्री? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

वीज कापल्यास वीज जोडणीची जबाबदारी घेणार वंचितवीज बिल माफ केलं नाही, तर कुणीही वीज बिल भरू नये. ज्यांची वीज कापली जाईल त्यांची वीज जोडून देण्याची जबाबदारी वंचित घेईल, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली आहे. 

मनसेही आक्रमकवाढीव वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कापण्यास कुणी आलं तर त्यांना मनसे स्टाइल शॉक देऊ असा इशाराच मनसेनेच्या नेत्यांनी दिला आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरुन येत्या काळात मनसेकडून मोठं आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यात जनतेकडून बळजबरीनं वीज बिल घेतलं जाणार अशेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा, अशा इशाराच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीelectricityवीजAkolaअकोला