'डम्पिंग ग्राउंड'वर पीपीई किट; आयुक्तांनी बजावली 'शो कॉज'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 16:39 IST2020-05-26T16:39:08+5:302020-05-26T16:39:57+5:30
आरोग्य अधिकारी डॉ.फारुख शेख, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर ,मोटर वाहन विभाग प्रमुख श्याम बगेरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

'डम्पिंग ग्राउंड'वर पीपीई किट; आयुक्तांनी बजावली 'शो कॉज'
अकोला: शहरातील नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर कोरोना बाधित रुग्णांना हाताळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीपीई किट उघड्यावर फेकून देण्यात आल्याच्या प्रकाराची मनपा आयुक्त संजय कापडनीस यांनी गंभीर दखल घेत याप्रकरणी मनपाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.फारुख शेख, स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर ,मोटर वाहन विभाग प्रमुख श्याम बगेरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून 24 तासांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांनी 428 चा आकडा गाठला आहे. शहराच्या विविध भागात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्य अकोलेकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरातील कचरा साठवणूक केल्या जाणाºया नायगाव येथील डम्पिंग ग्राउंड येथे कोरोना बाधित रुग्णांना हाताळण्यासाठी वापरल्या जाणाºया पीपीई कीट उघड्यावर फेकून देण्यात आल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असताना पीपीई किटची बायोमेडिकल वेस्टच्या निकषानुसार विल्हेवाट लावणे गरजेचे असताना 'ा कीट उघड्यावर टाकून देण्यात आल्याने नायगाव परिसरातील स्थानिक रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली. याप्रकरणी प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन तसेच महापालिका प्रशासनासोबत चर्चा करून दोषी व्यक्तिवर कारवाईची मागणी लावून धरली होती. तसेच याप्रकरणी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार केली. शहरात कुरणा विषाणूचा उदेक लक्षात घेता या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.फारुख शेख, स्वच्छता विभागाचे प्रमुख प्रशांत राजूरकर तसेच मोटार वाहन विभाग प्रमुख श्याम बगेरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.