वीज कर्मचार्‍यांना दिवाळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 20:15 IST2017-10-13T20:14:29+5:302017-10-13T20:15:05+5:30

दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण व सूत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचार्‍यांना १३,५00 रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी जाहीर केले, तसेच कंत्राटी कामगारांना ७,५00 रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

Power employees visit Diwali | वीज कर्मचार्‍यांना दिवाळी भेट

वीज कर्मचार्‍यांना दिवाळी भेट

ठळक मुद्दे१३,५00 रुपयांचे सानुग्रह अनुदान कंत्राटी कामगारांना ७,५00 रुपये सानुग्रह अनुदान


१३,५00 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण व सूत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचार्‍यांना १३,५00 रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी जाहीर केले, तसेच कंत्राटी कामगारांना ७,५00 रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.  
 नागपूर येथील बिजली नगर येथे ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. बैठकीला तीनही कंपन्यांचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सचिन ढोले, विनोद बोंद्रे आणि सूरज वाघमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सानुग्रह अनुदानाबाबतची घोषणा केली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे वीज कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Web Title: Power employees visit Diwali