शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्प : सिंचनाचा प्रश्न अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 2:21 AM

अकोट  : अकोट तालुक्यातील पोपटखेड लघु पाटबंधारे योजनेचा टप्पा -२ या प्रकल्पाचे काम  पुर्णत्वास येत आहे. या प्रकल्पातून सिंचनाकरिता शेतकर्‍यांना उपलब्ध करून द्यावयाचे पाणी कालव्याद्वारे द्यावे की पाइपलाइन टाकून द्यावे, हा  निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचा ठरणार की अधिकारी, कंत्राटदार यांच्या पथ्थ्यावर पडणार? या प्रश्नाचे गौडबंगाल कायम असताना आमदार प्रकाश भारसाकळे यांची अभ्यासू भूमिका यासंदर्भात महत्त्वाची ठरणार आहे. 

ठळक मुद्देकालवा की पाइपलाइने पाणीपुरवठा यावरून संभ्रम

विजय शिंदे। लोकमत न्यूज नेटवर्कअकोट  : अकोट तालुक्यातील पोपटखेड लघु पाटबंधारे योजनेचा टप्पा -२ या प्रकल्पाचे काम  पुर्णत्वास येत आहे. या प्रकल्पातून सिंचनाकरिता शेतकर्‍यांना उपलब्ध करून द्यावयाचे पाणी कालव्याद्वारे द्यावे की पाइपलाइन टाकून द्यावे, हा  निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचा ठरणार की अधिकारी, कंत्राटदार यांच्या पथ्थ्यावर पडणार? या प्रश्नाचे गौडबंगाल कायम असताना आमदार प्रकाश भारसाकळे यांची अभ्यासू भूमिका यासंदर्भात महत्त्वाची ठरणार आहे. सातपुड्याच्या  पायथ्याशी पोपटखेड येथे सिंचन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने टप्पा दोनचे काम सुरू आहे. याकरिता नुकताच शासनाने मोठय़ा प्रमाणात निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. घडभरणी व शीर्षविमोचकाचे काम पूर्ण झाल्यानंतर सिंचनाकरिता जुन्या अंदाजपत्रकात कालव्याद्वारे पाणी वितरण व्यवस्था प्रस्तावित आहे; परंतु  शेतकर्‍यांना सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने कालव्याऐवजी पाइपलाइनद्वारे पाणी वितरण करण्याची मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ऑक्टोबर महिन्यात आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केली होती, तसेच शासनाने सिंचनाकरिता पाइपलाइनद्वारेच पाणी पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे.  त्यावर जलसंपदा मंत्री यांनी प्रकाश भारसाकळे यांच्या मागणीला महत्त्व देत पाइपलाइनने पुरवठा करण्याच्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला दिल्याची माहिती आहे. त्यामुळे महामंडळाने कालव्यासाठी भू संपादन करण्याची प्रक्रिया थांबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कालव्यांच्या कामात हितसंबंध गुंतलेल्या काही अधिकार्‍यांनी पाइपलाइनद्वारे पाणी वितरण होऊ नये, याकरिता आटापिटा सुरू केला असल्याची माहिती आहे. त्याकरिता आमदार प्रकाश भारसाकळे यांचेसुद्धा मन वळविण्यात कंत्राटदार व काही अधिकारी धडपडत आहेत. दुसरीकडे लाभक्षेत्रात येणार्‍या शेतकर्‍यांनी मात्र १७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री व पालकमंत्री, खासदार यांच्याकडे पाइपलाइनद्वारेच पाणी वितरण करण्याची मागणी रेटून धरली             आहे. यामध्ये सुधारित अंदाजपत्रक सादर करून पाइपलाइननेच पाणी द्यावे, यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास व संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. 

तर एक आदर्श प्रकल्प होऊ शकतो 1पोपटखेड धरणावरून पाइपलाइनने पाणी सिंचनाकरिता वितरित केल्यास जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते, तसेच पाण्याची नासाडी न होता विनातक्रार वितरण व्यवस्था सुलभ होऊ शकते.  शेतीचेसुद्धा तुकडे पडणार नाहीत. रस्त्याचीसुद्धा अडवणूक होणार नाही. विशेषत: भूसंपादनावर होणारा कोट्यवधींचा खर्च व त्यानंतर कालवे करण्याकरिता कंत्राटदाराला निविदेनुसार द्याव्या लागणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या बचतीमधून जुन्या पोपटखेड प्रकल्पाच्या कालव्यावरसुद्धा पाइपलाइन टाकल्यास शेतकर्‍यांचे सिंचनाचे हित साध्य होईल. 2याकरिता अंदाजपत्रकात कालव्याऐवजी पाइपलाइनकरिता प्रयत्न केल्यास पोपटखेड प्रकल्प एक आदर्श प्रकल्प ठरू शकतो. त्याकरिता आमदार प्रकाश भारसाकळे यांची कोणती भूमिका राहते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :akotअकोटDamधरण