पोपटखेड सिंचन प्रकल्प रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 20:22 IST2017-05-14T20:22:14+5:302017-05-14T20:22:14+5:30

अकोट : तापी खोऱ्यातील पूर्णा उपखोऱ्यातून वाहणाऱ्या पोपटखेड गावाजवळ पठार नदीवर पोपटखेड (टप्पा-२)च्या प्रकल्पाचे काम नऊ वर्षांपासून सुरूच आहे.

Pophathed Irrigation Project Stops! | पोपटखेड सिंचन प्रकल्प रखडला!

पोपटखेड सिंचन प्रकल्प रखडला!

लघू पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अकोट : तापी खोऱ्यातील पूर्णा उपखोऱ्यातून वाहणाऱ्या पोपटखेड गावाजवळ पठार नदीवर पोपटखेड (टप्पा-२)च्या प्रकल्पाचे काम नऊ वर्षांपासून सुरूच आहे. निर्धारीत जागेवरून काळी माती न आणता इतर क्षेत्रात शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे, प्रकल्पाचे काम रखडण्याचे ते कारण आहे.
पोपटखेड धरणाकरिता आवश्यक असलेली काळी माती पणजजवळील शहापूर (बृहत) प्रकल्पावरून घेऊन जाण्याबाबत लघू पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी पोपटखेड प्रकल्पाच्या कंत्राटदाराला पत्र देऊन कळविले होते. तरीसुद्धा शासनाचे मालकीचे महागाव येथील कापसी शिवारातील ई-क्लास जमिनीमधील काळ्या मातीवर डल्ला मारण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. अकोट महसूल विभागाची उत्खनन व वाहतुकीची परवानगी न घेता अनेक दिवसांपासून माती चोरीत वेळ गेल्याने प्रकल्पाच्या कामाची गती मंदावली आहे. पोपटखेड लघू पाटबंधारे योजना (टप्पा-२)च्या प्रकल्पास ३०२५.४७ कोटी रुपये मूळ किमतीस ९ मे २००८ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाच्या कार्यारंभाचा आदेश एन.व्ही. भास्कर रेड्डी अँड कंपनीला १५ डिसेंबर २००८ ला देण्यात आला. सदर प्रकल्प सन २०१० मध्ये २ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र नियोजित कालावधीत काम पूर्ण न करता ३०२५.४७ कोटी मूळ किंमत असलेल्या या प्रकल्पाकरिता ७२२७.६७ लाख रुपयांचा सुधारित प्रस्ताव ७ एप्रिल २०१६ रोजी मंजूर झाला आहे. तरीसुद्धा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे आता ३१ जुलै २०१७ पर्यंतचा मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पर्यायाने प्रकल्पाची किंमतसुद्धा वाढीव राहणार आहे. या प्रकल्पामुळे कोणतेही गाव, रस्ता बाधित होत नसून, पुनर्वसनाची कामे नव्हती. केवळ महसूल बुडवित माती चोरी करीत कोट्यवधी रुपये कमविण्याच्या घोरात मूळ किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. या धरणाची लांबी २०५० मीटर माथा रुंदी ४.५० मीटर तर महत्तम उंची २६.८६ मीटर राहणार आहे. या प्रकल्पासाठी १०७ हेक्टर भूसंपादनापैकी ५८.४१ हेक्टर भूसंपादन झाले. या धरणात ८.३६८ द.ल.घ.मी. साठा होणार आहे. पाणलोट क्षेत्र ७५.८८ चौ. कि.मी. राहणार असून, सिंचनाखाली १००६ हेक्टर जमीन येणार आहे. पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण नसून, परिसरातील आंबोडा, मोहाळा, खुदवंतपूर, अकोलखेड, वाई, अकोली (जहॉ.) आदी गाव लाभ क्षेत्रात आहेत.

Web Title: Pophathed Irrigation Project Stops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.