शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

गरीब शिधापत्रिकाधारकांना मिळणार तीन महिन्यांचे धान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:09 AM

गरीब शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य चालू महिन्यातच मिळणार आहे.

अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये गरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ११ लाख ७५ हजार २६३ गरीब शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य चालू महिन्यात वितरित करण्याचे नियोजन जिल्हा पुरवठा विभागामार्फत मंगळवारी करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य चालू महिन्यातच मिळणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणासाठी शासन-प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये गरीब कुटुंबांची उपासमार होऊ नये, धान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी गरीब शिधापत्रिकाधारकांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य वितरण चालू महिन्यात (मार्चमध्ये) करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील ११ लाख २९ हजार ३४० आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत ४५ हजार ९२३ अशा एकूण ११ लाख ७५ हजार २६३ शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य चालू महिन्यात करण्याचे नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना तीन महिन्यांचे धान्य वितरण चालू महिन्यात करण्यात येणार आहे.१ लाख ८ हजार क्विंटल धान्यसाठा वितरणाचा आदेश!जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारक ११ लाख ७५ हजार २६३ लाभार्थींना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य चालू महिन्यात वितरित करण्यासाठी १ लाख ८ हजार ८१० क्विंटल धान्यसाठा वितरित करण्यात येत असल्याचा जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे यांनी २४ मार्च रोजी दिला. त्यामध्ये ६१ हजार १५५ क्विंटल गहू आणि ४७ हजार ६५५ क्विंटल तांदूळ वितरणाचा समावेश आहे.शासन आदेशानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे धान्य वितरण मार्च महिन्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय धान्य वितरणाचा आदेश देण्यात आला आहे.-बी. यू. काळे,जिल्हा पुरवठा अधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस