मूर्तिजापूर-कारंजा रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST2021-07-17T04:16:16+5:302021-07-17T04:16:16+5:30
तालुक्यातील मूर्तिजापूर-कारंजा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली ...

मूर्तिजापूर-कारंजा रस्त्याची दयनीय अवस्था
तालुक्यातील मूर्तिजापूर-कारंजा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याची दुरवस्थाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी व ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तालुक्यातील हा मार्ग महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. तसेच या मार्गावरून अवजड वाहनांची रहदारी जास्त असल्याने खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनाचे स्पेअर पार्ट तुटत असल्याने वाहनचालकास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. दररोज अपघाताच्या घटना घडत असल्याने वाहनचालकास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (फोटो)