खेट्री-चतारी रस्त्याची दयनीय अवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:22 IST2021-09-24T04:22:55+5:302021-09-24T04:22:55+5:30
गत काही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे अनेक वेळा खड्ड्यांमध्ये पडून अनेक अपघातही झाले आहेत. याबाबत पाण्याचे ...

खेट्री-चतारी रस्त्याची दयनीय अवस्था!
गत काही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे अनेक वेळा खड्ड्यांमध्ये पडून अनेक अपघातही झाले आहेत. याबाबत पाण्याचे डबके साचल्याने ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम तसेच विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहनधारकांना ये-जा करावी लागत आहे. वाडेगाव येथे मोठी बाजारपेठ असल्याने तसेच अकोला, बाळापूर, पातूर जाण्यासाठी हा मार्ग एकमेव असल्याने ग्रामस्थांना याच मार्गाने जावे लागत आहे. साचलेल्या पाण्यातून वाहन काढण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद विभागाकडे वारंवार तक्रार केली; परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल घेतली गेली नाही. परिणामी दररोज अपघातात अनेकजण जखमी होत आहेत.
फोटो:
थातूरमातूर डागडुजी केल्याचा आरोप
गेल्या दोन वर्षापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर संबंधितांनी दखल घेऊन डागडुजी केली होती. परंतु थातूरमातूर डागडुजी केल्यामुळे रस्ता जैसे थे झाला आहे. बाबूजीवर लावलेला खर्च पाण्यात गेला आहे. संबंधित व कंत्राटदार यांनी मिलीभगत करून थातूरमातूर डागडुजी करून लाखो रुपये लाटल्याचा आरोप होत आहे.
खेट्री-चतारी मार्गाची अनेक वेळा दुरुस्ती केली; मात्र संबंधित व कंत्राटदार यांच्या संगनमताने निकृष्ट साहित्य वापरून देयक लाटले जाते. दुरुस्ती केल्यानंतर महिनाभरातच रस्ता जैसे थे होऊन मोठमोठे खड्डे पडतात.
-मो. अशपाक, ग्रामस्थ खेट्री
खेट्री-चतारी मार्गाची गेल्या काही महिन्यांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहन काढण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरवर्षी थातूरमातूर डागडुजी केली जाते. - अनुप पजई, ग्रामस्थ खेट्री
230921\img20210714134417_00.jpg
दयनीय अवस्था