अकोला जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून ४९३६ ‘बीएलए’ची नेमणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:48 IST2019-10-07T14:48:33+5:302019-10-07T14:48:39+5:30
भाजपाकडून १ हजार ६८०, शिवसेनाकडून १ हजार ५४० आणि काँग्रेसकडून ९२४ नावे जिल्हा निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहेत.

अकोला जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून ४९३६ ‘बीएलए’ची नेमणूक!
अकोला: विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त विविध राजकीय पक्षांकडून जिल्ह्यात ४ हजार ९३६ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलए) नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपाकडून १ हजार ६८०, शिवसेनाकडून १ हजार ५४० आणि काँग्रेसकडून ९२४ नावे जिल्हा निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहेत.
अकोला जिल्ह्यात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर असे पाच विधानसभा मतदारसंघ असून, १ हजार ७३० मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलए) ची नेमणूक करणे आवश्यक असते. त्यासाठी निवडणूक विभागामार्फत राजकीय पक्षांना सूचनाही देण्यात येतात. राजकीय पक्षांकडून देण्यात आलेल्या नावांनुसार निवडणूक विभागामार्फत राजकीय पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना ‘बीएलए’ म्हणून ओळखपत्र दिली जातात. त्यानुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर ‘बीएलए’ची नेमणूक करण्यासाठी जिल्ह्यात विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून ४ हजार ९३६ ‘बीएलए’ची नावे जिल्हा निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहेत. त्यामध्ये भाजपाकडून १ हजार ६८० नावे, शिवसेनाकडून १ हजार ५४० नावे व काँग्रेसकडून ९२४ नावे देण्यात आली असून, दिलेल्या नावानुसार ‘बीएलए’ची नेमणूक करण्यात आली आहे.
पक्षनिहाय अशी करण्यात आली ‘बीएलए’ची नेमणूक!
पक्ष बीएलए
भाजपा १६८०
काँग्रेस ९२४
राष्ट्रवादी काँग्रेस ३०५
शिवसेना १५४०
इतर ४८७
...........................................
एकूण ४९३६
मतदान केंद्रात वाढ!
गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात १ हजार ६८० मतदान केंद्र होते. या वेळच्या विधानसभा निवडणुकीत २३ मतदान केंद्र वाढल्याने, जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या आता १ हजार ७०३ इतकी झाली आहे.