मुलीवर अत्याचार करणार्या बापास पोलीस कोठडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:00 IST2017-11-22T22:55:28+5:302017-11-22T23:00:26+5:30
यथेच्छ मद्य प्राशन केल्यानंतर एका नराधम बापाने मुलीवरच जबरी संभोग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

मुलीवर अत्याचार करणार्या बापास पोलीस कोठडी!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यथेच्छ मद्य प्राशन केल्यानंतर एका नराधम बापाने मुलीवरच जबरी संभोग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लुंबिनी नगरात राहणार्या एका बापाने त्याच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला रविवारी त्याचे सासर असलेल्या हिवरखेड ये थे घेऊन गेला. या ठिकाणी पाय खूप दुखत असल्याचे कारण समोर करून त्याने १२ वर्षीय मुलीला पाय चेपण्यासाठी बोलावून मुलीचे तोंड दाबून तिच्यावर जबरी संभोग केला. मुलीने बापाचा अत्याचार आईकडे कथन केला, त्यामुळे माय-लेकीने तत्काळ डाबकी रोड पोलीस स्टेशन गाठून मद्यधुंद बापाचा हा प्रताप पोलीस ठाण्यात सांगितला. पोलिसांनीही तातडीने वैद्यकीय उपचार क ेल्यानंतर नराधम बापाविरुद्ध बलात्कार व पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर बापाचा शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणाचे घटनास्थळ हिवरखेड असल्याने डाबकी रोड पोलिसांनी हा तपास आणि नराधम बापास हिवरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने नराधम बापास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.