शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पोलीस अधीक्षकांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 5:54 PM

बुधवारी दुपारी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.

अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषाणूला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे; मात्र जीवनावश्यक सेवांवर पोलिसांच्या बंदोबस्ताचा परिणाम होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी बुधवारी दुपारी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.कोरोना संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यांच्या सीमाही बंद केलेल्या आहेत; मात्र जीवनावश्यक वस्तूंची सेवा पुरविणारी दुकाने सुरूच ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. विनाकारण बाहेर निघणाºयांना पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखविण्याच्या सूचना खुद्द गृहमंत्र्यांनी केलेल्या आहेत; मात्र तरीही काही जण औषधांची जुनी चिठ्ठी, किराणा यांसह विविध कारण समोर करून बाहेर येत आहेत. अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान अकोला पोलिसांसमोर असल्याने पोलीस अधीक्षक गावकर यांनी शहरातील ठाणेदारांसह, शहर पोलीस उपअधीक्षक यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन अकोलेकरांना केले आहे. संयम ठेवा, स्वत:च्या तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आपण घरातच राहून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी केले आहे. साठेबाजांचा घेणार शोधजीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून त्याची चढ्या दराने विक्री करणाºयांचा शोध घेण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी केल्या आहेत. साठेबाजी करणारे तसेच चढ्या दराने विक्री करणाºयांवर आता पोलीस प्रशासनाचा वॉच राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेत जागतिक संकटात तरी काळाबाजार करू नये, असेही गावकर यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस