बेपत्ता अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी घेतला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:17 IST2021-03-15T04:17:12+5:302021-03-15T04:17:12+5:30

अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभूळगाव जहागीर येथून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एमआयडीसी पोलिसांनी तीन दिवसात ...

Police search for missing minor girl | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी घेतला शोध

बेपत्ता अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी घेतला शोध

अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभूळगाव जहागीर येथून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एमआयडीसी पोलिसांनी तीन दिवसात शोध घेतला. या मुलीला तिच्या आई - वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

बाभूळगाव जहागीर येथील रहिवासी स्नेहा संजय मोरे ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात केल्यानंतर एमआयडीसी ठाणेदार किशोर वानखेडे यांनी त्यांच्या पथकासह मुलीचा शोध सुरू केला. अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याचे प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची थेट पोलीस महासंचालक कार्यालयातून दखल घेतल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी तातडीने या मुलीचा शोध सुरू केला. येवता, विझोरा, बाभूळगाव तसेच सोनाळा परिसरात या मुलीचा शोध घेतला असता पोलिसांना तिचा शोध घेण्यात यश आले. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला आई - वडिलांच्या स्वाधीन केले.

Web Title: Police search for missing minor girl