तोल जाऊन रेल्वेखाली जाणाऱ्या प्रवाशाला पोलिसाने वाचवले!
By नितिन गव्हाळे | Updated: January 24, 2023 16:12 IST2023-01-24T16:11:20+5:302023-01-24T16:12:49+5:30
धावत्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये प्रवासी चढत असताना घडला प्रकार

तोल जाऊन रेल्वेखाली जाणाऱ्या प्रवाशाला पोलिसाने वाचवले!
नितीन गव्हाळे, अकोला: रेल्वेगाडी चढत असताना प्रवाशाचा अचानक तोल गेला. प्रवाशी प्लॅटफॉर्म कोसळला आणि रेल्वेखाली जात असताना, तेथे उपस्थित पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून, धाव घेत, त्याला तातडीने बाजुला घेतले. त्यामुळे त्याचे प्राण वाचवले.
अकोला: खाकीला सलाम! तोल जाऊन रेल्वेखाली जाणाऱ्या प्रवाशाला पोलिसाने वाचवले... (व्हिडीओ- नितीन गव्हाळे)#Akola#railway#viralvideopic.twitter.com/FoZT233xhF
— Lokmat (@lokmat) January 24, 2023
२३ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास धावत्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये एक प्रवाशी चढत असताना, त्याचा अचानक तोल गेला. हा प्रवाशी प्लॅटफॉर्म पडल्यानंतर प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीमधील गॅपमध्ये पडत असताना, याठिकाणी गस्तीवर असणारे रेल्वे पोलिस कर्मचारी विलास पवार यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी या प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर ओढून त्याचे प्राण वाचविले. त्यामुळे प्रवाशाने पोलिस कर्मचारी पवार यांचे आभार मानले,