आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा छापा; एकास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:40 IST2019-04-09T13:40:44+5:302019-04-09T13:40:49+5:30

अकोला: सिंधी कॅम्प परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लावल्या जात असलेल्या सट्ट्यावर खदान पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा घातला. पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले.

Police raids on IPL beating; One arrested | आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा छापा; एकास अटक 

आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा छापा; एकास अटक 

अकोला: सिंधी कॅम्प परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लावल्या जात असलेल्या सट्ट्यावर खदान पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा घातला. पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.
सिंधी कॅम्प परिसरातील एका घरामध्ये आयपीएलच्या किंग्स एलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद या दोन संघादरम्यानच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावल्या जात असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या घरात सुरू असलेल्या सट्ट्यावर छापा घातला. घरातून काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. पोलिसांनी या घरातून हजारो रुपयांच्या मुद्देमालासह मोबाइल, एलईडी टीव्ही व इतर काही साहित्य जप्त केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू असल्यामुळे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे कळू शकली नाहीत. शनिवारीसुद्धा सनसिटी येथे पोलिसांनी चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब संघादरम्यानच्या क्रिकेट सामन्यावरील सट्ट्यावर कारवाई करून पाच जणांना अटक केली होती. (प्रतिनिधी)

 

Web Title: Police raids on IPL beating; One arrested