दारूच्या अड्डय़ावर पोलिसांची धाड

By Admin | Updated: April 3, 2017 02:48 IST2017-04-03T02:48:11+5:302017-04-03T02:48:11+5:30

मूर्तिजापूर पोलिसांनी शनिवारी रात्री ९.३0 वाजता धाड टाकून ३८ हजार रुपयांचा माल जप्त केला.

Police raid on liquor stand | दारूच्या अड्डय़ावर पोलिसांची धाड

दारूच्या अड्डय़ावर पोलिसांची धाड

मूर्तिजापूर (अकोला), दि. २- स्थानिक स्टेशन विभागात सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्डय़ावर मूर्तिजापूर पोलिसांनी शनिवारी रात्री ९.३0 वाजता धाड टाकून ३८ हजार रुपयांचा माल जप्त केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने संपूर्ण देशात राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गालगतची दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला आहे.
शनिवारी रात्री स्टेशन विभाग परिसरात अवैध गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती मूर्तिजापूर शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून १0५ लीटर गावठी दारू व इतर साहित्य असा ३८ हजार २00 रुपयांचा ऐवज जप्त केला.
ही कारवाई ठाणेदार गजानन पडघन तसेच उपनिरीक्षक कोथळकर, ह.काँ. मोहोड, गणेश पांडे, गोलंदाज लांजेवार, पंकज श्रीवास व आठवले आदींनी केली. राष्ट्रीय महामार्गावरील व राज्य मार्गावरील दुकाने बंद झाल्याने गावठी दारुचे ग्राहक वाढले आहेत.

Web Title: Police raid on liquor stand