हरिहर पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 13:53 IST2018-09-30T12:31:22+5:302018-09-30T13:53:07+5:30
जुगार अड्ड्यावर जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांनी शनिवारी रात्री उशीरा पथकासह छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.

हरिहर पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहर पेठ येथे एका ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांनी शनिवारी रात्री उशीरा पथकासह छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आला आहे.
हरिहर पेठ येथील रहिवासी अरुण पांडुरंग अंधारे आणि तुषार दीपक उघडे हे दोघेजण जुगार अड्डयावर असल्याची माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी हरीहर पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जुने शहर चे ठाणेदार अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात पप्पू ठाकूर, रशीद व तायडे यांनी केली.