Police personnel who have done remarkably well will be honored! | उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान!
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान!

अकोला: पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, तसेच आंतरिक सुरक्षा सेवा पथक, विशेष पथक देऊन १५ आॅगस्ट रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह प्राप्त होणाºया पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाºयांमध्ये एपीआय रामेश्वर चव्हाण (एमआयडीसी), एएसआय कुलदीपसिंह चंदेल (मुख्यालय), प्रभाकर खोंड, डीएएसआय देवनारायण दुबे, मोहम्मद सादिक मो. सुभान, दिनेश सोनकांबळे (बोरगाव मंजू), शेषराव ठाकरे (मुख्यालय), संजय सोळंके (मूर्तिजापूर), प्रमोद नवलकार (दहीहांडा), चरण तायडे, विष्णू जाधव (बॅन्ड पथक), दिनेश साबळे, गिरधर चव्हाण (हिवरखेड), महेश सावंत (सिव्हिल लाइन), प्रशांत इंगळे (बीडीडीएस), किसन पातोंड (कोतवाली), रामबहादूर चव्हाण (एमआयडीसी), फारूख अहमदखा मेहबुबखा (खदान), पूर्णाजी वाघमारे, संजय भुरके, अनिल मैत्रे, मो. मोईन मो. याकुब (मूर्तिजापूर), नीतेश तायडे (मुख्यालय), विजय धबाले (बार्शीटाकळी), अजीनाथ गर्जे (सिव्हिल लाइन) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Police personnel who have done remarkably well will be honored!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.