व्यापाऱ्यांकडून पोलीस अधिकऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:24 IST2021-09-08T04:24:51+5:302021-09-08T04:24:51+5:30

अकोट : शहरातील दरोड्याचा तपास मोठ्या शिताफीने लावत ७२ तासांत आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा स्थानिक व्यापाऱ्यांनी सत्कार केला. ...

Police officers felicitated by traders | व्यापाऱ्यांकडून पोलीस अधिकऱ्यांचा सत्कार

व्यापाऱ्यांकडून पोलीस अधिकऱ्यांचा सत्कार

अकोट : शहरातील दरोड्याचा तपास मोठ्या शिताफीने लावत ७२ तासांत आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा स्थानिक व्यापाऱ्यांनी सत्कार केला.

बाजारपेठेत नियोजनबद्ध व्यापारी सेजपाल यांच्या घरी दरोडा टाकून मुद्देमालासह आरोपींनी पोबारा केला होता. ठोस पुरावा न सोडणारे आरोपींचा ७२ तासांत छडा लावणारे अकोट शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे यांचा शहरातील व्यापाऱ्यांनी शाल व श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला.

यावेळी व्यापारी संघटनेचे संतोष झुनझुनवाला, सतरामदास पारवानी, हरीश टावरी, अशोक संघाणी, किरण सेजपाल, यश्विन सेजपाल, महेंद्र तरडेजा, मुकेश सेजपाल, संतोष अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, विनोद सादराणी, नैमिष सेजपाल, प्रदीप नहाटे, नितीन वालसिंगे, अवी पालेकर, दिलीप बोचे, सतीश श्रावगी, चंचल पितांबरवाले, सत्यनारायण टिबडेवाल, भरत मणियार, अरुण शिवपूरवाले उपस्थित होते.

Web Title: Police officers felicitated by traders